जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज🚩.
⛳जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज .⛳
छत्रपती शिवाजी महाराज कोण होते ? हे फक्त महाराष्ट्राला नाही तर अवघ्या जगाला माहित आहे.
“ इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर ,
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती”.
शिवाजी महाराज आजही लोकांच्या घराघरात, मनामनात जिवंत आहेत, आजही सर्वांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे . माणूस म्हणून पाहताना शिवाजी महाराज एक आदर्श व्यक्तिमत्व आहे . शिवाजी महाराजांनी नेहमी स्त्रियांचा आदर केला. स्त्री स्वातंत्र्याला त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले.
त्यांनी त्यांच्या मावळ्यांना देखील कोणत्याही स्त्रीचा अनादर होईल असं न वागण्याची सक्त ताकीद दिली होती. शिवाजी महाराज हिंदुत्व , मराठी आणि संस्कृत भाषेचे समर्थक होते. परंतु त्यांनी नेहमी दुसऱ्या धर्माचा आदर केला . त्यांच्या सैन्यामध्ये सर्व जाती आणि धर्माचे सैनिक होते.
शिवाजी महाराजांबद्दल थोडक्यात सांगायचे तर,
”सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला,
भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला,
हातात घेउनी तलवार शत्रूंवर गरजला,
महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला”.
शिवाजी महाराज हे एक भगवं वादळ होतं, त्यांनी गुलामगिरीत जगणार्या, अन्याय सहन करणाऱ्या जनतेला आशेचा किरण दाखवला.
शिवाजी महाराजांनी एक राजा म्हणून कधीही हुकूमशाही केली नाही. त्यांनी जनतेसाठी जनतेचे स्वराज्य निर्माण केले होते. शिवाजी महाराज नेहमी न्यायासाठी लढले. त्यांनी नेहमी दूरदृष्टी ठेवली.
जेव्हा गरज पडली तेव्हा त्यांनी थोड्या काळासाठी माघार पण घेतली. पण रयतेचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. म्हणतात ना,
“तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर
तोंडात वाजवून मिळवावा लागतो”.
'आपल्याला भुक लागल्यावर स्वतःच्या ताटातलं खाणं याला प्रकृती म्हणतात, दुसऱ्याच्या ताटातलं ओढून खाणं त्याला विकृती म्हणतात, आपल्याला भूक असताना आपल्या ताटातलं दुसऱ्याला देणे याला भारतीय संस्कृती म्हणतात'. शिवाजी महाराज, संत तुकाराम, गाडगे महाराज या सर्व व्यक्तींनी भारतीय संस्कृती जपली आहे. आपणही ती जपली पाहिजे.
आजच्या पिढीने फक्त शिवाजी महाराजांचा वारसा न सांगता, शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात केले पाहिजे . शिवाजी कोण होता? हे जाणून घेतले पाहिजे. शिवाजी महाराजांचे विचार पुढे नेले पाहिजे. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन धर्माधर्मात मध्ये भांडण न करता शिवाजी महाराजांसारखे सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे.
Comments
Post a Comment